Rice Man: भाताचे 10 प्रकार शोधून काढणारी 'ही' मराठी व्यक्ती माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

भात

भात शिवाय जेवण म्हणजे अशक्य... आपल्या पैकी बऱ्याच लोकांना दिवसातून एकदा तरी भात खायला आवडतोच

rice man khobragade | sakal

रेसिपी

भाताचे वेगवेगळे प्रकार वाचले तरी तोंडाला पाणी सुटते. खिचडी, जिरा राईस, फ्राईड राईस, पुलाव, बिर्याणी, अशा असंख्य प्रकारांची तांदळाची रेसिपी असते.

rice man khobragade | sakal

मराठी व्यक्ती

पण तुम्हाला हे माहित आहे का? कि या भाताचे प्रकार एका मराठी व्यक्तीनी शोधून काढले आहेत. त्यांच नाव दादाजी रामाजी खोब्रागडे

rice man khobragade | sakal

दादाजी रामाजी खोब्रागडे

दादाजी रामाजी खोब्रागडे हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते.

rice man khobragade | sakal

अल्पभूधारक शेतकरी

केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले.

rice man khobragade | sakal

कृषिभूषण

तांदळाच्या बाबतीतील संशोधनाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून २००६ मध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार मिळाला होता.

rice man khobragade | sakal

भाताचे एकूण नऊ वाण

खोब्रागडे यांनी भाताचे एकूण नऊ वाण शोधले

एच.एम.टी. सोना, नांदेड हिरा, नांदेड चेन्नूर, विजय नांदेड, नांदेड ९२, डीआरके, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी., डीआरके-२

खोब्रागडे यांनी केलेल्या संशोधनाच्या जोरावर अनेक बियाणे कंपन्यांनी पैसे मिळवले. ते मात्र हलाखीचे जीवन जगत राहिले.

rice man khobragade | sakal

मानाचा मुजरा.

२०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत नाव, आणि असंख्य पुरस्कार प्राप्त

अशा या मराठी माणसाला मानाचा मुजरा.

Rice Man Khobragade | sakal