दीपा-कार्तिक एकत्र आले आणि टीआरपी वाढला!

नीलेश अडसूळ

गेली दोन आठवडे 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. या मालिकेला धोबीपछाड करत 'रंग माझा वेगळा' पुन्हा अव्वल ठरली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका आहे.

sakal

शुभम आणि किर्तीच्या नात्यातील नवे वळण हीट ठरल्याने कायम पहिल्या दोन क्रमांकावर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

sakal

तर दोन आठवडे पहिला क्रमांक मिळवणारी 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका यंदा बरीच मागे पडून टीआरपीच्या चौथ्या स्थानावर आहे.

sakal

पाचवा क्रमांक 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला मिळाला आहे. पाचही स्थानावर 'स्टार प्रवाह' वाहिनीच्या मालिका असल्याने ही वाहिनी पुन्हा एकदा सर्वाधिक टीआरपी मिळवणारी वाहिनी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal