मिरजेत गणपती विसर्जन शांततेत संपन्न

कार्तिक पुजारी

विसर्जनाची धूम

राज्यभर गणपती विसर्जनाची धूम पाहिला मिळत आहे. आज गणपतीचे विसर्जन होत असले तरी गणपती पुढच्या वर्षी नक्की येईल यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे.

मिरजेत

मिरजेमध्ये गणपती विसर्जन शांततेत पार पडले.

सेन्सिटिव्ह

२००९ साली मिरजेमध्ये विसर्जनाच्या वेळी मोठी दंगल झाली होती. त्यामुळे मिरज सेन्सिटिव्ह मानलं जातं.

तरी सर्व नागरिकांनी एकजुटीने आपल्या गणरायाला निरोप दिला.

सुरेश खाडे

विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे हेही मिसळ्याचं दिसतं.

फुगडी

खाडे यांनी नागरिकांसोबत उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी फुगडी धरल्याचेही पाहायला मिळाले.

मार्केट परिसर

मार्केट परिसरातील गणपती मंडळांना खाडे यांनी भेट दिली. तसेच विसर्जनात सहभागही घेतला.

देखावे

गणेशोत्सवानिमित्त मिरजेत विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले होते.

डोळ्यात पाणी

गणरायाला शेवटचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं.

निरोप

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत नागरिकांनी गणेशाला निरोप दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.