अंतराळात हरवलेला टॉमॅटो आठ महिन्यांनी स्पेस स्टेशनवर सापडला!

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंतराळात असे काही घडले आहे जे आश्चर्यकारक आहे. मार्चमध्ये अंतराळात पिकवलेल्या टोमॅटोची काढणी सुरू असताना एक टोमॅटो गायब झाला.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर तैनात असलेल्या अंतराळवीर फ्रँक रुबिओकडून तो हरवला होता. तेव्हापासून अंतराळवीर त्याचा शोध घेत होते. आता आठ महिन्यांनंतर टोमॅटोचा काही भाग तेथे तैनात असलेल्या क्रू मेंबर्सना मिळाला आहे. तो केवळ आयएसएसवरच उपस्थित असल्याचे उघड झाले.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या अंतराळवीर जास्मिन मोघबेली यांनी एका व्हिडिओद्वारे संपूर्ण जगाला दाखवले आणि हे जुने गूढ उकलले आहे.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

द गार्डियनच्या वृत्तानुसार, एक प्रयोग म्हणून, अमेरिकन अंतराळवीर फ्रान्सिस्को फ्रँक रुबियो यांनी मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये टोमॅटो वाढवण्याचा प्रयत्न केला. याला व्हेज-05 प्रयोग असे म्हणतात.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

टोमॅटोची अनेक झाडे बियांपासून वाढली आणि त्याला टोमॅटो देखील लागले. 29 मार्च 2023 रोजी टोमॅटो काढण्यात आले आणि ते सर्व अंतराळवीरांना नमुने म्हणून देण्यात आले.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

फ्रँक रुबिओलाही त्याचा काही भाग प्लास्टिकच्या पिशवीत देण्यात आला होता. रुबिओने हा 1 इंचाचा टोमॅटो खाण्याआधीच तो स्पेस स्टेशनमध्ये हरवला.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

त्यावेळी रुबिओची खूप खिल्ली उडवली गेली. त्याला दोषी ठरवण्यात आले. तो टोमॅटो खाल्ल्याचे सांगण्यात येत होते. पण आता हा हरवलेला टोमॅटो सापडला आहे.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त तिथे उपस्थित असलेल्या अंतराळवीराने लाइव्ह स्ट्रीम करून हे रहस्य उघड केले. मात्र अंतराळवीर जास्मिन मोघबेली यांनी टोमॅटो कुठे आणि कोणत्या स्थितीत सापडला हे सांगितले नाही.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal

याआधी चीनने चंद्रावर शेती करण्याचा प्रयत्न केला होता. शास्त्रज्ञ कोणत्या ग्रहांवर शेतीसाठी संधी असू शकतात हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पृथ्वीवरील अनेक समस्या सुटू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

missing tomato found in international space station after eight months nasa astronauts solved mystery | Esakal