मिझोराममध्ये Baryl Vanneihsangi ठरल्या सर्वात तरुण महिला आमदार

सकाळ डिजिटल टीम

मिझोराम निवडणुकीत तीन महिला नेत्या विजयी

Mizoram Election Result 2023 : मिझोराम विधानसभा निवडणूक-2023 मध्ये फक्त तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत तीन महिला नेत्या विजयी होण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

बेरिल व्हॅनीहसांगी यांची जोरदार चर्चा

लालदुहोमा यांच्या पक्षाच्या झोरम पीपल्स मूव्हमेंटच्या बेरिल व्हॅनीहसांगी आणि लालरिनपुई विजयी झाल्या आहेत. याशिवाय, मिझो नॅशनल फ्रंटच्या प्रोवा चकमा याही आमदार झाल्या आहेत. मात्र, या सगळ्यांत बेरिल व्हॅनीहसांगी यांची जोरदार चर्चा झाली.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

सर्वात तरुण महिला आमदार

बेरिल व्हॅनीहसांगी ह्या मिझोराममध्ये आमदार झालेल्या सर्वात तरुण महिला आहेत. त्या सध्या 32 वर्षांच्या आहेत.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

बेरिल व्हॅनीहसांगी अविवाहित

बेरिल व्हॅनीहसांगी यांचं अद्याप लग्न झालेलं नाही, त्या अविवाहित आहेत. आपल्या विजयाचं श्रेय त्यांनी राज्यातील महिलांना दिलं आहे.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

पहिल्यांदा लढवली महानगरपालिका निवडणूक

बेरिल यांनी काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता. प्रथम त्यांनी आयझॉल महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक झाल्या.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात

बेरिल व्हॅनीहसांगी यांनी आपल्या करिअरची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली होती. त्यानंतर त्या टीव्ही आणि मॉडेलिंग क्षेत्रात आल्या.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

बेरिल यांचं मूळ गाव आयझॉल

बेरिल यांनी सुरुवातीचं शिक्षण आपल्या गावीच घेतलं. त्या मूळच्या मिझोरामच्या आयझॉल येथील आहेत.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal

बेरिल यांचा 1,414 मतांनी विजय

बेरिल यांनी मिझोरम आयझॉल दक्षिण-III मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 1,414 मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 9,370 मतं मिळाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baryl Vanneihsangi Mizoram | eSakal