सूरज यादव
भारतात सध्या मोबाईल डेटाची किंमत प्रती जीबी ९.०८ रुपये इतकी आहे.
दहा वर्षापूर्वी भारतात मोबाईल डेटाची किंमत प्रती जीबी २६९ रुपये इतकी होती.
जियो, एअरटेलसारख्या टेलिकॉम कंपन्या फक्त ११ रुपयांमध्ये १० जीबी डेटा देतायत.
२००४ मध्ये मोबाईल डेटाची किंमत मेगाबाईटनुसार होती. १० ते १५ रुपयांना एक मेगाबाईट इतका डेटा उपलब्ध असायचा.
२०१६ मध्ये रिलायन्स जिओने ४जी सेवा सुरु होताच एक जीबी डेटा ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दिला.
२०१८ मध्ये मोबाईल डेटाच्या किंमती ९५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्या. एक जीबी डेटाची किंमत १० ते २० रुपयांपर्यंत होती.
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात डेटा खूप स्वस्त आहे. अमेरिका, युरोप यांसारख्या देशात एक जीबी डेटासाठी ३०० ते ५०० रुपये मोजावे लागतात.
इटलीसह फिजी देशात मोबाईल डेटा 7 ते ८ रुपये प्रती जीबी इतका मिळतो.
इस्रायलमध्ये सरासरी १.७० रुपये प्रती जीबी डेटाची किंमत आहे. भारतापेक्षा इथं स्वस्त डेटा मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.