Mobile Tips : मोबाईल वापरत वापरत जपा डोळ्यांचं आरोग्य, पाहा टिप्स

Sudesh

मोबाईलचा वापर

मोबाईलच्या अतिवापराचे तोटे आपल्याला माहिती आहेत. मात्र तरीही कामासाठी मोबाईल वापरावाच लागतो.

Mobile Tips for better eyes | Esakal

ब्लू लाईट

मोबाईलमधून येणाऱ्या निळ्या लाईटमुळे डोळ्यांना भरपूर नुकसान होतं. डोळ्यातील कॉर्निया आणि लेन्स ही लाईट सहन करू शकत नाहीत.

Mobile Tips for better eyes | Esakal

दुष्परिणाम

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा थकवा, डोळ्यांमधील खाज आणि कोरडेपणा, दृष्टी कमकुवत होणे असे दुष्परिणाम दिसून येतात.

Mobile Tips for better eyes | Esakal

टिप्स

यामुळेच मोबाईल वापरत असताना आपल्या डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Mobile Tips for better eyes | Esakal

ब्राईटनेस

गरज नसताना भरपूर ब्राईटनेस वाढवून ठेऊ नका. आजूबाजूच्या लाईटनुसार ब्राईटनेस अ‍ॅडजस्ट करत रहा.

Mobile Tips for better eyes | Esakal

चेहऱ्यापासून अंतर

मोबाईल वापरताना तो नेहमी डोळ्यांपासून 16 ते 18 इंच दूर असावा. यामुळे डोळ्यांना इजा होत नाही.

Mobile Tips for better eyes | Esakal

अंधारात वापर

अंधारात मोबाईल वापरणे टाळा. अगदीच गरज असेल, तर त्यानुसार स्क्रीन ब्राईटनेस शक्य तितकी कमी करा.

Mobile Tips for better eyes | Esakal

20-20-20

मोबाईल वापरत असताना 20 मिनिटं झाल्यानंतर 20 सेकंदांसाठी तुमचा फोन बाजूला ठेऊन 20 फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो.

Mobile Tips for better eyes | Esakal

पापण्या फडकवा

मोबाईल वापरत असताना थोड्या-थोड्या वेळाने पापण्या फडकावल्याने डोळ्यांमध्ये आद्रता टिकून राहते. यामुळे डोळ्यात कोरडेपणा किंवा खाज अशा समस्या होत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Tips for better eyes | Esakal