मुंबईत कधी होते पावसाची एन्ट्री? कसा होता गेल्या ५ वर्षांचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

यंदा मॉन्सूनचा वेग वाढला

मॉन्सूनच्या आगमनाचा प्रवास यंदा वेगवान होण्याची शक्यता आहे. १३ मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल झाला असून केरळमध्ये २७ मेपर्यंत पावसाचे आगमन होईल.

Monsoon onset over Kerala | eSakal

मॉन्सून महाराष्ट्रात कधी?

अंदमान आणि केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो - की महाराष्ट्रात मॉन्सून कधी येणार? चला जाणून घेऊ गेल्या सात वर्षांत काय झालं होतं!

When will Monsoon arrive in Mumbai | eSakal

२०१८

२०१८ मध्ये मात्र मॉन्सून एरवीपेक्षा लवकरच म्हणजे ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता.

Monsoon onset in 2018 | eSakal

२०१९

२०१९ मध्ये मॉन्सूनचे आगमन प्रचंड रखडले होते. त्या वर्षी २५ जून रोजी मॉन्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाला.

Monsoon onset in 2019 | eSakal

२०२०

आदल्या वर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये मॉन्सून मुंबईत लवकर आला. त्या वर्षी १४ जून रोजी पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या होत्या.

Monsoon onset in 2020 | eSakal

२०२१

२०२१ मध्ये मॉन्सूनने लवकर हजेरी लावत ९ जून रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता.

Monsoon onset in 2021 | eSakal

२०२२

२०२२ मध्ये मॉन्सूनने मुंबईत व महाराष्ट्रात वेळेवर म्हणजे ११ जून रोजी हजेरी लावली.

Monsoon onset in 2022 | eSakal

२०२३

त्या वर्षीही २०१९ चीच पुनरावृत्ती झाली. २०२३ मध्ये २५ जून रोजी मॉन्सून मुंबईत दाखल झाला होता.

Monsoon onset in 2023 | eSakal

२०२४

गेल्या वर्षी ९ जून रोजी मॉन्सूनचे मुंबईत आगमन झाले होते आणि १५ ऑक्टोबर रोजी अधिकृतरित्या पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon onset in 2024 | eSakal