Monsoon Health Tips : पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टींचं सेवन

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मान्सूननं दणका दिला. पण, या ऋतूत डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक आजारही सोबत घेऊन येतात. आरोग्य तज्ज्ञ पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवण्याचा आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेहमीच देत असतात.

Monsoon Season Health Tips

तळलेले मसालेदार पदार्थ

पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. अशा प्रकारच्या अन्नामुळं शरीरातील चरबी आणि पित्त वाढते, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. म्हणूनच पकोडे, समोसे किंवा तळलेले पदार्थ टाळावेत.

Monsoon Season Health Tips

हिरव्या भाज्या खाऊ नयेत

पावसाळ्यात कोबी, पालेभाज्या, पालक आणि हिरव्या भाज्या खाऊ नयेत. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळं पालेभाज्यांमध्ये किडे झपाट्याने वाढू लागतात.

Monsoon Season Health Tips

पावसाळ्यात मांसाहार टाळा

पावसाळ्यात आपली पचनसंस्था खूप कमकुवत होते, त्यामुळे जड अन्न पचणे कठीण होते. अशा परिस्थितीत या ऋतूत मांसाहार टाळा. जास्त चरबीयुक्त किंवा लाल मांस खाणे देखील टाळावे.

Monsoon Season Health Tips

दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात

दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर पावसाळ्यात करू नये, कारण दहीमध्ये बॅक्टेरिया देखील असतात, जे या ऋतूत आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.

Monsoon Season Health Tips

मशरूमचे सेवन टाळा

पावसाळ्यात मशरूमचे सेवनही टाळावे असे डॉक्टर सांगतात. थेट जमिनीत वाढणाऱ्या मशरूमला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season Health Tips