धनश्री भावसार-बगाडे
पावसाळा आणि रोमॅन्स हे समिकरणच जसं अतुट आहे. पावसाळी वातावरण होताच मूड आपोआप रोमँटिक होतो.
मग अशात काहीतरी रोमँटिक प्लॅन बनणे सहाजिक आहे. जर तुम्हाला हनुमूनचे दिवस परत जगावेसे वाटत असतील तर इथे काही खास टिप्स तुमच्यासाठीच.
जर घरात पत्नी किंवा स्वयंपाकाची बाई जेवण बनवत असेल तर त्यांना आज सुट्टी द्या आणि आज तुम्हा खास जोडिदाराच्या आवडचं जेवण बनवा.
पाऊस पडताना रोमँटिक मूडमध्ये एकमेकांची आवड जपत खाऊ घालण्यातली गंमत एरवी कधी अनुभवता येणार..
पावसात किचममध्ये काम करत केलेल्या रोमांस हा नक्कीच तुम्हाला कायमच्या गोड आठवणी देऊन जातील.
दोघांच्याही आवडीचा कॉमन गेम सोबत खेळा. किंवा पिक्चर गेम म्हणजे जूने फोटो बघत आठवणी सांगयचा खेळही तुमच्यासाठी छान रोमँटिक आठवणी जागवणारा ठरेल.
जोडिदारासाठी खास घर सजवा. तुमच्या मूडप्रमाणे घरातची सजावट आणि वातावरण पण रोमँटिक करा.
दोघांच्या आवडीचा एखादा रोमँटिक मूव्ही घरातच एकत्र बसून बघा.
तुमच्या घरातच तुम्ही एकमेकांच्या कुशीत शिरत काही निवांत क्षण घालवू शकतात. छान गप्पा मारू शकतात.
जर तुम्हाला हनिमूनच्या आठवणी परत ताज्या कराव्याशा वाटत असतील तर घरातला बेडच पुन्हा डेकोरेट करा आणि जूने दिवस, आठवणी नव्याने जागा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.