मान्सूनमध्ये Malshej Ghat येथे फिरायला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

दत्ता लवांडे

Malshej Ghat

पावसाळ्यात माळशेज घाट हा पर्यटकांना खुणावत असतो.

Malshej Ghat

Malshej Ghat Tourism

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे हे माळशेजचे सौंदर्य.

Malshej Ghat

Monsoon Season

हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.

Malshej Ghat

Monsoon Tourism

माळशेज घाटाच्या जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

Malshej Ghat

Pune Tourism

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली-सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते.

Malshej Ghat

Rainy Season

पण पावसाळ्यात इथे जात असाल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण पावसाळ्यात दरड कोसळण्याची भिती जास्त असते.

Malshej Ghat

WaterFall

या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाहने सावकाश चालवणे गरजेचे आहे. शक्यतो दुचाकीवर जाणे टाळायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malshej Ghat