हैदराबादची इंटरनॅशनल दादागिरी! टी 20 मध्ये 250 प्लस धावांचा केला नवा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

आंतरराष्ट्रीय स्तरावर टी 20 फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 वेळा 250 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम सरे क्रिकेट क्लबच्या नावावर होता.

आता सनराईजर्स हैदराबादनं आयपीएल 2024 मध्ये तिसऱ्यांदा 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हैदराबादनं आता सरेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सोमेरसेट क्रिकेट क्लब आहे. त्यांनी 2 वेळा फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यॉर्कशायरने देखील 2 वेळी टी 20 क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे.

आरसीबीने देखील आयपीएलमध्ये 2 वेळा 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.