Mount Everest: माउंट एव्हरेस्ट - सर्वोच्च शिखर - आणि त्याचे किस्से

Swapnil Kakad

समुद्रसपाटीपासून उंची

समुद्रसपाटीपासून ८८४८.८६ मीटर म्हणजेच जवळपास २९००० फूट उंचीवर असलेले 'माउंट एव्हरेस्ट शिखर' हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.

Mount Everest Facts | esakal

स्थान

नेपाळ आणि चीन च्या सीमेवर पसरलेले हे एव्हरेस्ट हिमालयाच्या महालंगुर हिमाल सब-रेंजमध्ये आहे.

Mount Everest Facts | esakal

नाव

या पर्वताला अनेक वेगवेगळी नावे देखील आहेत. नेपाळी नाव सागरमाथा तर तिबेटियन नाव चोमुलुंगमा. अशी उपनाव असणाऱ्या या पर्वताचे नाव भारताचे सर्वेयर म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

Mount Everest Facts | esakal

फर्स्ट रेकॉर्ड

२९ मे १९५३ ला 'सर एडमंड हिलरी' हे न्यूझीलंडमधील एक गिर्यारोहक आणि त्यांचे तिबेटी मार्गदर्शक 'तेनझिंग नोर्गे' यांनी एव्हरेस्ट चढुन फर्स्ट रेकॉर्ड केला.

Mount Everest Facts | esakal

कमी ऑक्सिजन

एव्हरेस्टच्या ८००० मीटरच्या उंचीवर असलेला 'डेथ झोन'. नॉर्मल ऑक्सिजनच्या प्रमाणात इथे कमी ऑक्सिजन मिळाल्याने अनेकांचे मृत्यू या ठिकाणी होतात.

Mount Everest Facts | esakal

वनस्पती आणि प्राणी

माउंट एव्हरेस्टवर फक्त बर्फच नाही तर अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी देखील आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळतात.

Mount Everest Facts | esakal

एव्हरेस्ट बेस कँप

पर्वताच्या पायथ्याशी असा एक पॉइंट आहे ज्याला EBC(Everest Base Camp) म्हणून देखील ओळखले जात. बहुतांश एव्हरेस्ट मोहिमा ह्या बेस कँपातूनचं सुरू केल्या जातात.

Mount Everest Facts | esakal

ट्रेकिंग

माउंट एव्हरेस्टवर ट्रेकिंग पेक्षा EBC च्या ट्रेकिंगला जास्त गर्दी असते असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Everest Facts | esakal