धोनी निवृत्तीनंतर करतो शेती पण आहे हजार कोटींची संपत्ती

अनिरुद्ध संकपाळ

महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर अनेकवेळा शेती करताना दिसला आहे. तो सेंद्रिय शेती आणि कुकुटपालन देखील करतो.

MS Dhoni

जरी महेंद्रसिंह धोनी आपल्या संपत्तीचा, स्टारडमचा बडेजावपणा करत नसला तरी त्याच्याकडे थोडी थोडकी नाही तर तब्बल 1040 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

MS Dhoni

धोनीचा आयपीएल पगार

धोनीला सीएसके वर्षाला 12 कोटी रूपये देते. याचबरोबर त्याला हंगामातील एका सामन्याला जवळपास 85 लाख रूपये मिळतात.

MS Dhoni

धोनीचे फार्महाऊस

महेंद्रसिंह धोनीचे रांची येथील फार्म हाऊस हे 7 एकरमध्ये पसरले आहे. या फार्म हाऊसची किंमत अंदाजे 6 कोटी रूपये इतकी आहे.

MS Dhoni

धोनीची पुण्यातही प्रॉपर्टी

धोनीने पुणे आणि मुंबईत देखील प्रॉपर्टी आहे. त्याच्या अंधेरी वेस्ट मधील अरबी समुद्राच्या काठावरील घराचे काम सुरू आहे. त्याचे पुण्यातील रावेत येथे देखील इस्टाडो प्रेसिडेंशियलमध्ये घर आहे.

MS Dhoni

धोनीच्या जाहिराती

महेंद्रसिंह धोनी टीव्हीएस मोटर्स, व्हायकॉम 18, गल्फ ऑईल, भारत मेट्रीमॉनी, रीबॉक, ड्रीम 11, ओरिओ, मास्टर कार्ड आणि स्निकरची जाहिरात करतो. तो यातून वर्षाला 30 ते 50 कोटी रूपये कमवतो.

MS Dhoni

महेंद्रसिंहच्या आलिशान गाड्या अन् जेट

महेंद्रसिंह धोनी हा गाड्यांचा शौकीन असल्याचे सर्वांना माहिती आहेच. त्याच्या कलेक्शनमध्ये सध्या 20 च्यावर विविध प्रकारच्या गाड्या आहे. याचबरोबर त्याच्याकडे 110 कोटी रूपये किंमतीचे प्रायव्हेट जेट देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni