कितीही मॅच विनर येऊ देत... डेथ ओव्हरचा किंग धोनीच!

अनिरुद्ध संकपाळ

महेंद्रसिंह धोनी

आयपीएलच्या एका हंगामात डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही महेंद्रसिंह धोनीच्याच नावावर आहे.

महेंद्रसिंह धोनी

त्याने 2014 च्या आयपीएल हंगामात 16 ते 20 षटकांमध्ये 170.3 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा ठोकल्या होत्या.

डेव्हिड मिलर

16 ते 20 षटकात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलर आहे. त्याने 2022 मध्ये 178.1 च्या स्ट्राईक रेटने 171 धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंह धोनी

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा धोनीचाच जलवा दिसून येतो. त्याने 2013 च्या हंगामात 192.2 च्या स्ट्राईक रेटने 148 धावा केल्या होत्या.

रिंकू सिंह

या यादीत चौथ्या क्रमांकावर रिंकू सिंहचे नाव आहे. त्याने सध्या सुरू असलेल्या 2023 च्या आयपीएल हंगामात 224.5 च्या स्ट्राईक रेटने 137 धावा केल्या आहेत.

निकोलस पूरन

या यादीत निकोलस पूरन हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2022 च्या आयपीएल हंगामात 188.4 च्या स्ट्राईक रेटने 130 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.