रोहित कणसे
IPL च्या १६ व्या हंगमामाची आज अहमदाबादच्या सांगता होणार असून ४ वेळा विजेता राहिलेली CSKआणि सलग दुसऱ्या हंगामात फायनलमध्ये पोहचलेल्या GT यांच्यात लढत आहे
चेन्नई सुपर किंग्जने १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून संघ पाचवी ट्रॉफी जिंकेल अशी आशा चेन्नईच्या चाहत्यांना आहे.
MS Dhoni retirement ipl and csk tribute to ms dhoni ahed of IPL Final GT vs CSK महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्याद्वारे त्याचा 250 वा आयपीएल सामना खेळणार आहे.
आजचा सामना हा धोनीचा हा शेवटचा आयपीएल सामना असल्याची चर्चा आहे.
दरम्यान CSK ने धोनीचे आभार मानलेत, माझ्या प्रिय थाला, प्रत्येक वेळी जेव्हा तू मैदानात पाऊल ठेवले तेव्हा तू आम्हाला फुलपाखरे दिलीत, असे सिएसकेने म्हटले आहे.
या मोसमाच्या सुरुवातीपासूनच महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा वाढत आहेत.
धोनी पुढील सीझन खेळणार की नाही हे अधिकृतपणे कोणालाच माहीत नाहीये.
टूर्नामेंट दरम्यान एका सामन्यानंतर याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की त्याला निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने लागतील.
फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनाही धोनी पुढील हंगामात खेळेल अशी अपेक्षा आहे. मात्र धोनीचे चाहते सोशल मीडियावर भावुक होताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.