मुघल-ए-आझमचे बेल्जियम कनेक्शन, मग दिलीप कुमार झाले राजकुमार सलीम

Anuradha Vipat

रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप साहब आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी असे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, ज्यासाठी ते रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत राहिले आहेत

Dilip Kumar birth anniversary

मुघल-ए- हा एक ऐतिहासिक चित्रपट

त्यांचा असाच एक चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. त्यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.मुघल-ए- हा एक असा ऐतिहासिक चित्रपट आहे, जो कोणीही विसरत नाही.

Dilip Kumar birth anniversary

या चित्रपटाची निर्मिती

भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच 1944 साली हा चित्रपट बनवण्याची योजना सुरू झाली होती. दिग्दर्शक के. आसिफनेही 1946 पासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते.परंतु त्यावेळी दिलीप साहब आणि मधुबाला या चित्रपटात नव्हते, तर स्टारकास्ट वेगळी होती. यापूर्वी शिराज अली या चित्रपटाची निर्मिती करत होते, असे म्हटले जाते.

Dilip Kumar birth anniversary

हा चित्रपट बनवण्याची जबाबदारी

पण 1947 मध्ये फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. त्यानंतर या चित्रपटावर कोणीही पैसे गुंतवायला तयार नव्हते. त्यानंतर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कंपनी शापूरजी पालोनजी यांनी हा चित्रपट बनवण्याची जबाबदारी घेतली.

Dilip Kumar birth anniversary

यांना कास्ट करण्यात आले

त्यानंतर चित्रपटाचे काम पुढे सरकले, पण यावेळी दिलीप साहब आणि मधुबालासोबत. शहजाद सलीमच्या भूमिकेसाठी दिलीप साहब आणि अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबाला यांना कास्ट करण्यात आले

Dilip Kumar birth anniversary

बेल्जियममधून काच आणली

शीशमहलमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या…’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल. हे गाणे के. आसिफला ते कॅमेऱ्यात इतक्या तपशिलात कैद करायचं होतं की त्याने शीशमहाल बांधण्यासाठी बेल्जियममधून काच आणली होती.

Dilip Kumar birth anniversary

या कथेला 16 वर्षे पूर्ण

इतकंच नाही तर काचेसोबतच खऱ्या हिऱ्यांचाही वापर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये करण्यात आला आहे.स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या या कथेला 16 वर्षे पूर्ण झाली आणि हा चित्रपट 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Kumar birth anniversary