काय सांगता! मुंबईतील या मार्केटमध्ये मिळतात 1 रुपयांमध्ये सुंदर कानातले

Aishwarya Musale

दागिने

दागिने हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या, कंबरपट्टा, पैंजण हे सर्व दागिणे प्रत्येक वयोगटातली महिला हौसेनं खरेदी करतात.

earrings | sakal

महागाई

आपल्याकडं असलेल्या ड्रेसवर मॅचिंग असा दागिना घेण्याची त्यांची इच्छा असते. पण, वाढत्या महागाईमुळे ते सर्वांना नेहमी शक्य होत नाही.

earrings | sakal

मुंबई

पण, आता काळजी करू नका. कारण मुंबईतील मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासूनचे कानातले खरेदी करता येतात.

earrings | sakal

भुलेश्वर मार्केट

मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात. या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किंमतीमध्ये कानातले मिळतात.

earrings | sakal

ब्रेसलेट

त्याचबरोबर 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात.

earrings | sakal

होलसेल

महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत सातत्यानं वाढत आहे. कोरोना व्हायरसनंतर महागाईमध्ये काहीपट वाढ झालीय. पण, मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये होलसेल दरात वेगवेगळी खरेदी करता येते.

earrings | sakal

लग्नाचा बस्ता

अनेक मुंबईकर लग्नाचा बस्ता इथंच खरेदी करतात. त्याचबरोबर दैनंदीन वापरासाठी दागिने आणि कपडेही इथं स्वस्त दरामध्ये मिळतात.

earrings | sakal

शॉप

पण, अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं मुंबईतील हे शॉप सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठा खजिना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

earrings | sakal