Mumbai Rain : पाऊस बेफाम, मुंबई जाम!

युगंधर ताजणे

प्रचंड त्रास, त्रागा, मनस्ताप...

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसानं नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. नागरिकांना घरी जाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे.

Mumbai Rain | esakal

जनजीवन विस्कळीत...

मुंबई सध्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Mumbai Rain | esakal

रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं...

मुंबईतील पाऊस हा नेहमीच मुंबईकरांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. आता मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे काही तास उशिरानं धावत आहेत.

Mumbai Rain

ऑरेंज अलर्ट...

येत्या काळात मुंबईतील काही उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासन वेगानं हालचाल करुन नागरिकांची काळजी घेत आहे.

Mumbai Rain

मुख्यमंत्र्यांचे आदेश...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण सुचना देऊन अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे.

Mumbai Rain

युद्धपातळीवर तयारी...

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत होणारा पाऊस या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं युद्धपातळीवर तयारी केल्याचे दिसून आले आहे.

Mumbai Rain

जगण्यासाठी कसरत...

मुंबईतील उपनगरांना जोडणारी रेल्वे सेवा ही मुंबईची लाईफलाईन आहे. ती बंद झाल्यानं अनेकांना घरी जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Mumbai Rain

घरी लवकर जा...

मुख्यमंत्री शिंदे यांनी सततचा पाऊस आणि त्यामुळे साचलेले पाणी या कारणास्तव सरकारी कर्मचाऱ्यांना देखील कामावरुन घरी लवकर परतण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai Rain

अधिवेशनावर झाला परिणाम...

पावसाळी अधिवेशनात देखील कामकाज लवकर उरकत मुंबईतील पावसाची स्थितीची आढावा घेण्यासाठी मंत्री बाहेर पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumvai rain