टी 20 लीग इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायजी MI की CSK?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स आणि आयपीएलचा प्रवास एकाच वेळा सुरू झाला. संघाची मालकी ही जगातील सर्वात मोठा उद्योग समुह रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडे आहे.

Mumbai Indians

जागतिक टी 20 लीगमध्ये दबदबा

मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने जगातील वेगवेगळ्या 5 टी 20 स्पर्धांमधील संघ विकत घेतले आहेत. त्यांनी SA20 मध्ये एमआय केप टाऊन, IPL आणि WPL मध्ये मुंबई इंडियन्स, ILT20 मध्ये एमआय अमिराती, MCL मध्ये एमआय न्यूयॉर्क असे पाच संघ खरेदी केले आहेत.

Mumbai Indians

मुंबई इंडियन्सकडे किती टायटल्स?

मुंबई इंडियन्सने फ्रेंचायजी म्हणून आतापर्यंत 9 टायटल जिंकले आहेत. यात आयपीएल 5, चॅम्पियन्स लीग टी 20 मध्ये 2 विजेतेपदं आहेत. या वर्षी त्यांनी वुमन्स प्रीमियर लीग आणि मेजर क्रिकेट लीगचे टायटल देखील जिंकले.

Mumbai Indians

मुंबई इंडियन्सचे यश

मुंबईने आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आपल्या नावार केला आहे. त्यांनी 248 सामन्यात 138 सामने जिंकले आहेत. मात्र विनिंग पर्सेंटेजमध्ये त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई आघाडीवर आहे. मुंबईचे विनिंग पर्सेंटेज हे 56.68 इतके आहे.

Mumbai Indians

चेन्नई - मुंबईत अव्वल कोण?

मुंबईचे चेन्नई विरूद्धचे रेकॉर्डही त्यांच्या बाजूनेच झुकते. त्यांनी चेन्नईविरूद्ध 36 सामन्यांपैकी 20 सामने जिंकले आहेत. तसेच आयपीएल फायनल जिंकण्यामध्ये देखील तेच आघाडीवर आहेत. त्यांनी सहावेळा आयपीएल फायनल गाठली आहे. त्यातील 5 वेळा विजेतेपदाला गवसणी घातली.

Mumbai Indians

मुंबईचे चॅम्पियन्स लीग रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स लीग जिंकण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 5 हंगमात दोनवेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत जगातील विविध टी 20 लीगमधील संघ सहभागी होत होते.

Mumbai Indians

2023 हे मुंबई इंडियन्सचे वर्ष

मुंबई इंडियन्सच्या दोन संघांनी यंदा पदार्पणातच विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात वुमन प्रीमियर लीगचे टायटल जिंकले. त्यानंतर मेजर क्रिकेट लीगमध्ये एमआय न्यूयॉर्कने विजेतेपदाला गवसणी घातली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians