संतोष कानडे
आपण नखं कापतो आणि कचऱ्यात टाकतो. परंतु याच नखांना ७५ लाख रुपये किलोचा भाव मिळतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
कापलेल्या नखांसंदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये नखं विक्री होत असल्याचा दावा करण्यात आलाय.
जपानमध्ये नखांचा व्यवसाय होत असून, तिथे ७५ लक्ष रुपये किलोने नखं विकली जातात, असा हा दावा आहे.
तसेच नखांच्या माध्यमातून सौदर्यप्रसाधनं बनवली जात असल्याचंही व्हिडीओत सांगण्यात आलेलं आहे.
मात्र व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचं पुढे येतंय. जपानमध्ये अशी कुठलीही खरेदी-विक्री होत नाही.
मग व्हिडीओमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसणारी नखं कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय.
सदरील व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याची माहिती आहे. नखांच्या व्यवसायासंदर्भात इंटरनेटवरही माहिती उपलब्ध नाही.
नखांना ७५ लाख रुपये किलोचा भाव मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.
केसांचा व्यापार होतो, तसा नखांचाही होत असेल असा गैरसमज व्हायरल व्हिडीओमुळे निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.