विनयन वाघमारे
१९६३ साली शाळा संपवून दुपारी दोन वाजता ८ किलोमीटर पायी कामावर जायचं. रात्री १० वाजता पुन्हा ८ किलोमीटर पायी परतायचं. घरी पोहोचायला मध्यरात्रीचे १२ वाजायचे. मोबदला मिळायचा महिना ३५ रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण!
येताना-जाताना वाटेत दोन वेळा स्मशान लागायचं. रात्री भयाण शांतता असायची. पण नाना म्हणतात, "कधीच भूत दिसलं नाही. कारण पोटातली भूक ही कोणत्याही भुतापेक्षा कित्येक पटीने भयाण होती!"
पोटातली भूक विसरण्यासाठी वर्गात खोड्या केल्या, गुरुजींनी ओणवे उभे करून अंगठे धरायला लावले. नंतर अर्धपोटी राहण्याची अशी सवय झाली की, कशाचीच भीती उरली नाही. परिस्थितीने शाळेत न मिळणारे धडे शिकवले.
एकदा हॉटेलबाहेर रेंगाळल्यावर एका मुलाने हातावर दोन इडल्या ठेवल्या. नाना ओरडले, "मी भिकारी नाही!" रात्री आई-वडील खिडकीतून रडताना पाहिले. त्या दिवशी भुकेचा जिवलग मित्र भेटला ज्याचं नाव होतं 'अपमान'.
सकाळ-संध्याकाळ पाठीशी असणारा अपमान पचवायला शिकलो. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायांवर पडणाऱ्या मांजरासारखी निर्भयता आली. चेहऱ्यावर बेधडक हसू आलं आणि जगण्याला धार चढली.
"उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या असतात भूक आणि अपमान. आज मी यशाच्या पलीकडच्या तीरावर आलोय. ते गुरू आता अलीकडच्या तीरावर दुसऱ्यांना शिकवत आहेत; पण मी त्यांना कधीच विसरलो नाही!"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.