Nani : बॉलीवूडमध्ये 'नानी'च्या तोडीचा कुणी आहे का?

सकाळ डिजिटल टीम

टॉलीवूडच्या चित्रपटांची यंदाच्या वर्षी चांगलीच चलती असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा संघर्ष सुरु असताना त्यात टॉलीवूडनं बाजी मारली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला दसरा चित्रपट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रसिद्ध अभिनेता नानीनं त्यात साकारलेली भूमिका चाहत्यांना वेड लावून गेली आहे. त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

राम नवमीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन अ‍ॅक्शन चित्रपटाची ट्रीट प्रेक्षकांना मिळाली.

यात एकीकडे अभिनेता अजय देवगणचा भोला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मात्र यासगळ्यात साऊथचा दसरा हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे, दोन्ही चित्रपटात सुपरस्टार आणि दमादार अभिनयाला अ‍ॅक्शनची जोड आहे.

तेलुगू सुपरस्टार नानीचे मक्की आणि जर्सी सारखे सुपरहिट चित्रपट अनेक हिंदी प्रेक्षकांना भावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nani