ब्रह्मांडात आपण एकटे? NASAने लावला रहस्यमय सौरमालेचा शोध

Sandip Kapde

पृथ्वीप्रमाणेच अंतराळात अन्य एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का, याचा शोध शास्त्रज्ञ कित्येक शतकांपासून घेत आहेत.

kepler 385-photo

सात ग्रह

या संशोधनाला बळ देणारे निरीक्षण ‘नासा’च्या निवृत्त केप्लर या अवकाश दुर्बिणीद्वारे मिळालेल्या माहितीचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. या अभ्यासात सात ग्रहांच्या एका नव्या ग्रहमालेचा शोध लागला आहे.

kepler 385-photo

या ग्रहमालेचे नामकरण ‘केप्लर-३८५’ असे केले आहे. आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहापेक्षा तेथील प्रत्येक ग्रहाला त्याच्या मूळ ताऱ्यापासून प्रखर उष्णता मिळते.

kepler 385-photo

या सौरमंडळातील सातही ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे पण नेपच्यूनपेक्षा लहान आहेत. काही ज्ञात ग्रहमालेत ज्याप्रमाणे सहापेक्षा अधिक सत्यापित ग्रह किंवा लघुग्रह आहेत, त्याचप्रमाणे ‘केप्लर-३८५’ची रचना आहे.

kepler 385-photo

लघुग्रह

केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत चार हजार ४०० लघुग्रह शोधले आहेत. यामध्ये ७०० पेक्षा जास्त बहुग्रहमाला आहेत.

kepler 385-photo

केप्लर

‘‘केप्लर लघुग्रहांची आणि त्यांच्या गुणधर्मांची आतापर्यंतची सर्वांत अचूक यादी तयार केली आहे,’’ असे ‘नासा’च्या ॲमिज रिसर्च सेंटरमधील संशोधक शास्त्रज्ञ आणि नव्या यादीसंदर्भातील अहवालाचे प्रमुख लेखक जॅक लिसॉर यांनी सांगितले.

kepler 385-photo

केप्लर मोहिम

सौर मंडळाच्या बाहेर ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अनेक ज्ञात ग्रहांपैकी बहुतेकांचा शोध ‘नासा’च्या केप्लर मोहिमेने लावला आहे. या नव्या यादीमुळे खगोलशास्त्रज्ञांना अशा ग्रहांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

kepler 385-photo

‘केप्लर-३८५’ची रचना व वैशिष्ट्ये...

kepler 385-photo

ग्रहमाला

या ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्यासारखा तारा आहे. सूर्यापेक्षा दहा टक्क्याने मोठा आणि पाच टक्क्याने जास्त प्रखर आहे.

kepler 385-photo

या ताऱ्यानजीकचे दोन ग्रह पृथ्वीपेक्षा किंचित मोठे असून खडकाळ असण्याची शक्यता आहे. तेथे विरळ वातावरण असू शकते . इतर पाच ग्रहही पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.

kepler 385-photo

पृथ्वी

पाचही ग्रहांची त्रिज्या पृथ्वीच्या आकाराच्या दुप्पट असून तेथे दाट वातावरणात असणे अपेक्षित आहे

kepler 385-photo

‘केप्लर’ दुर्बिणीबाबत...

केप्लरचे उद्दिष्ट अंतराळातील नव्या ग्रहमालांचा शोध व त्यांची तपशीलवार माहिती घेणे आहे. केप्लरचे प्राथमिक निरीक्षण २०१३ मध्ये पूर्ण झाले.

kepler 385-photo

त्यानंतर दुर्बिणीच्या ‘के२’ मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली. ही मोहीम २०१८ पर्यंत सुरू होती.

kepler 385-photo

केप्लर

केप्लरने गोळा केलेल्या माहितीतून आजही नव्या रहस्यांचा उलगडा होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kepler 385-photo