पृथ्वीवर पाडलं जाणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; का? कधी? जाणून घ्या

रोहित कणसे

पृथ्वीभोवती अंतराळात फिरत असलेली प्रयोगशाळा, म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे लवकरच पृथ्वीवर पाडण्यात येणार आहे.

nasa is planning to crash International space station on earth

हे स्पेस स्टेशन पाडण्याची कारवाई या दशकाच्या शेवटी अमेरिका करणार आहे आणि यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

nasa is planning to crash International space station on earth

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) जमिनीवर पाडण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने यासाठी US डीऑर्बिट व्हेईकल तयार करण्यासाठी प्रपोजल मांडलं आहे.

nasa is planning to crash International space station on earth

हे USDV यान ISS ला अलगदपणे आपल्या कक्षेतून बाहेर काढेल, आणि पृथ्वीवर अशा ठिकाणी पाडेल, जिथे मानवी वस्ती नाही.

nasa is planning to crash International space station on earth

अमेरिका (NASA), रशिया (Roscosmos), युरोपियन युनियन (ESA), जपान (JAXA) आणि कॅनडा (CSA) या सर्वांनी मिळून ISS ची स्थापना केली होती. 

nasa is planning to crash International space station on earth

1998 सालापासून हे स्पेस स्टेशन कार्यरत असून येथे विविध देशांचे अंतराळवीर एकत्र येऊन संशोधन करतात.

nasa is planning to crash International space station on earth

हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं आहे. येथे एका वेळी सहा-सात अंतराळवीर कार्यरत असतात.

nasa is planning to crash International space station on earth

स्पेस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती, तेव्हाच याचं आयुष्य 2030 सालापर्यंत असेल हे निश्चित करण्यात आलं होतं, मात्र रशियाने 2028 पर्यंत यात सहभागी राहणार असल्याचं म्हटलंय

nasa is planning to crash International space station on earth

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन रिटायर झाल्यानंतर सर्व देश मिळून सुरक्षितपणे ISS ला डीऑर्बिट करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nasa is planning to crash International space station on earth