सकाळ डिजिटल टीम
हरिहर किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले पर्यटक टेम्पो ट्रॅव्हलरने परतत होते. घोटी–त्र्यंबकेश्वर मार्गावर त्यांच्या वाहनाचा काही जणांनी पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रवासाला धक्कादायक वळण मिळालं.
पर्यटकांच्या वाहनाने मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून सुरुवातीला वाद झाल्याचं तक्रारीत नमूद आहे. बाचाबाची वाढल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली.
वाद झाल्यानंतर काही जणांनी दुचाकीवरून पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर अखेर वाहन अडवण्यात आलं.
वावी हर्ष परिसरात पर्यटकांचं वाहन अडवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. चालक आणि प्रवाशांना शिवीगाळ करत काठी आणि चापटीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत गाडीची समोरील काच, साइड मिरर, छत आणि बंपरचं नुकसान झाल्याचं तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हरिहर किल्ला आणि परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशा घटनांमुळे पर्यटन मार्गावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.