मैत्रीचं व्हॅक्सीन घ्या अन् आयुष्यभर हेल्दी रहा

धनश्री भावसार-बगाडे

मैत्री आरोग्यासाठी

मैत्री फक्त मजामस्तीसाठी नाही तर तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फार आवश्यक असते.

Friendship Day 2023 | esakal

मैत्रीचे फायदे

मैत्रीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊया.

Friendship Day 2023 | esakal

एकमेव नातं जे आपण निवडतो

आपल्या आयुष्यातली सर्व नाती रक्ताने जोडली जातात. पती, पत्नीचे नाते जोडले जातानाही अनेक बंधनांसह नातेवाईकांच्या मर्जीने जोडले जाते. पण मैत्री हे नातं एकमेव असतं जे आपण इतर कोणत्याही बंधनाशिवाय स्वतः निवडतो.

Friendship Day 2023 | esakal

मैत्री एक प्रक्रिया असते

मैत्रीचं नातं एका दिवसात घडत नाही. ती एक प्रक्रिया असते. जी हळूहळू घट्ट होत जाते. यात मिळणाऱ्या कंफर्ट झोन मुळे.

Friendship Day 2023 | esakal

मैत्रीचे ३ प्रकार

तत्वज्ञ अरस्तूच्या मते मैत्रीचे ३ प्रकार असतात. १) कामासाठी किंवा कामामुळे झालेली मैत्री, २)मजा मस्ती करण्यासाठी मैत्री ३) माइंडफूल रोजच्या जीवनात उपयोगी ठरणारी मैत्री.

Friendship Day 2023 | esakal

माइंडफुल मैत्री

अशा प्रकारची मैत्री दीर्घकाळ टीकणारी असते. जरी तुम्ही वारंवार भेटत नसलात तरी गरजेच्यावेळी मित्र तुमच्यासाठी हजर असतात.

Friendship Day 2023 | esakal

मानसिक आधार

शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडणीच्या वेळी मित्र हा मोठा मानसिक आधार असतो. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकल्याने बराच ताण कमी होऊ शकतो.

Friendship Day 2023 | esakal

शेअरींग

तज्ज्ञ सांगतात की मैत्रीत होणाऱ्या शेअरिंगमुळे तुमचा मानसिक ताण बऱ्यापैकी हलका होतो. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो.

Friendship Day 2023 | esakal

फ्रेश माइंड

मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवल्याने, मजा, मस्ती केल्याने माइंड फ्रेश होतो. तणाव, थकवा निघून जातो ज्यामुळे नवी उर्जा अनुभवायला मिळते.

Friendship Day 2023 | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Friendship Day 2023 | esakal