नवरात्रीत दांडिया खेळून करा वजन कमी; मिळतील हे जबरदस्त फायदे...

Aishwarya Musale

नवरात्री

नवरात्रीच्या उत्सवाला देशभरात उद्यापासून सुरुवात होत आहे. दुसरीकडे नऊ दिवस ठिकठिकाणी दांडिया खेळले जाणार आहे. 

आरोग्य

दांडिया खेळून जेवढं मन उत्साही होतं, तेवढंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया दांडिया खेळल्याने तुम्हाला वजन नियंत्रित करण्याबरोबरच इतर अनेक फायदे मिळू शकतात.

ऊर्जा लागते

दांडिया खेळताना भरपूर ऊर्जा लागते. दमदार ट्यून आणि ड्रम बीट्सवर केलेला दांडिया शरीरासाठी तसेच मनासाठी खूप फायदेशीर आहे.

लवचिकता वाढते 

दांडिया खेळताना शरीराची सर्व बाजूंनी हालचाल होते.

शरीर

हात पायांच्या क्रिया सर्व दिशेने फिरतात यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची लवचिकता अधिक वाढते. 

डान्सिंग मोड

दांडिया खेळताना व्यक्ती सतत डान्सिंग मोडमध्ये असते.

शक्ती

यामुळे आपली फुफ्फुसे अधिक वेगाने काम करतात आणि श्वासोच्छवासाची शक्ती मजबूत करते.

हृदय

दांडिया खेळल्याने हृदयही मजबूत राहते कारण या काळात शरीर पूर्णपणे सक्रिय राहावे लागते.

वजन कमी

 दांडिया खेळताना संपूर्ण शरीर सक्रिय राहते. यामध्ये जोडीदाराबरोबर पुढे-मागे फिरावे लागते आणि त्यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.