Navratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागे 'ही' आहेत दोन कारणं

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रोत्सवात कंडोमची विक्री सर्वाधिक होते हे तुम्हाला माहित आहे का? ही बाब धक्कादायक वाटली तरी सर्वेक्षणातून समोर आली आहे.

गरबा कोरिओग्राफर, सेलिब्रिटीज याप्रमाणे कंडोमचीही याकाळात चलती असते.

त्यामुळे या काळात फक्त कंडोमचाच खप नाही तर गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांचीपण मागणी वाढते.

बऱ्याचदा सिनेमामध्ये गरबा म्हटले की, हिरो-हिरोईनमध्ये जवळीक दाखवली जाते. याचा तरूण-तरुणींच्या मनावर परिणाम होतो.

तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबर महिन्याची उष्णता आणि रात्रीची हलकीशी थंडी यांमुळे वाटणाऱ्या अल्हाददायकतेने जोडपी आपसूक कॅज्युअल सेक्सकडे वळतात.

याकाळात होणारे हार्मोनल बदल आणि रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहण्यास मिळालेली परवानगी हे यामागचे कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंध ठेवण्यात गैर नसले तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची क्षमता असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.