Sudesh
न्यूयॉर्कमध्ये बुधवारी हवा प्रदूषणाचा उच्चांक पहायला मिळाला. यामुळे आभाळाचा रंगही केशरी-भुरा झाला होता.
न्यूयॉर्कमधील या प्रदूषणाचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो एडिटेड नाहीत, तर न्यूयॉर्कमधील हवेचा रंंग खरोखरच तसा झाला होता.
बुधवारी न्यूयॉर्क हे जगातील सर्वात प्रदुषित शहर होतं. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार शहरातील हवेची पातळी अत्यंत धोकादायक होती.
अमेरिकेच्या हवामान विभागाने आणि न्यूयॉर्क प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आवाहन केलं आहे.
या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, नाक आणि घशाचा त्रास, खोकला, शिंका, सर्दी आणि श्वास घेण्यास अडचण अशा तक्रारी जाणवू शकतील; असा इशारा सरकारने दिला आहे.
या प्रदूषणामुळे न्यूयॉर्क शहरात दाट धुक्याचा थर जमा झाला होता. यामुळे कित्येक फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आल्या.
या प्रदूषणाला कॅनडामध्ये सुरू असलेले वणवे कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. न्यूयॉर्कमधील हवेत राखेचे कणही आढळले आहेत.
कॅनडामध्ये सध्या सुमारे ४०० ठिकाणी वणवे सुरू आहेत. आतापर्यंत तब्बल ६.७ मिलियन एकर जंगलामध्ये हे वणवे पसरले आहेत.
कॅनडातील या वणव्यांमुळे नॉर्थ अमेरिकेतील १३ राज्यांना हवा प्रदूषणाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.