Nitin Desai Death : का केली असेल आत्महत्या?

युगंधर ताजणे

बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे.

Nitin Desai Death

नितिन देसाई सारखा मोठा कलावंत अशा प्रकारे स्वताला संपवू शकतो यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. बॉलीवूड सेलिब्रेटींना देसाई यांना आदरांजली वाहिली आहे.

Nitin Desai Death

बॉलीवूडमध्ये १९४२ अ लव्ह स्टोरी पासून सुरु झालेला देसाई प्रवास आता संपला आहे. मराठीमध्ये त्यांनी बालगंधर्व चित्रपटाचे केलेले कलादिग्दर्शन हा देखील कौतूकाचा विषय होता.

Nitin Desai Death

यासगळ्यात देसाई यांनी आत्महत्या का केली असेल असे प्रश्न आता समोर आले आहेत, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा मानसिक दबाव होता का, ते कर्जात होते का, किंवा त्यांना कुणाची धमकी आली होती का, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

Nitin Desai Death

तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते म्हणून त्यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये मिळवली होती.

Nitin Desai Death

देसाई यांच्या जाण्यानं बॉलीवूड, मराठी मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

Nitin Desai Death

बॉलीवूडमधील विविध मान्यवरांनी देसाई यांच्या आठवणींना, त्यांच्या सोबतच्या प्रवासाला उजाळाही दिला आहे.

Nitin Desai Death

देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Desai Death