नितीन गडकरी वापरतात 60 लाखांची गाडी, काय आहे खास?

Sudesh

नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एक खास गाडी वापरतात.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

टोयोटा मिराई

गडकरी हे टोयोटा कंपनीची मिराई गाडी वापरतात. ही गाडी इतर गाड्यांप्रमाणे पेट्रोल किंवा डिझेलवर धावत नाही.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

हायड्रोजन कार

मिराई गाडी ही हायड्रोजन इंधनावर धावते. अशा प्रकारची भारतातील ही एकमेव गाडी आहे. गडकरींनी जपानवरून ही गाडी मागवली आहे.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

60 लाख किंमत

Toyota Mirai या गाडीची आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सुमारे 60 लाख रुपये किंमत आहे. ही गाडी अद्याप भारतात लाँच करण्यात आलेली नाही.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

फीचर्स

या कारमध्ये 12.3 इंच मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन, वायरलेस चार्जर, 8 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड अप डिस्प्ले, डिजिटल रिअल व्ह्यू मिरर आणि इतर बरेच अत्याधुनिक फीचर्स आहेत.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

सेफ्टी फीचर्स

सुरक्षेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग, हिल असिस्ट, ब्रेक असिस्ट, ईबीडी, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असे फीचर्स आहेत.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

इंजिन

या कारचं इंजिन हायड्रोजन प्युएल सेल टेक्नॉलॉजीने तयार केलं आहे. हे इंजिन 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करतं. सोबतच यात 1.24 kWH क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal

मायलेज

या कारमध्ये 5.2 किलो क्षमतेचा हायड्रोजन टँक देण्यात आला आहे. हा टँक फुल केल्यानंतर ही गाडी 646 किलोमीटर धावू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Car Toyota Mirai | eSakal