Nora fatehi: बांगलादेशात नोराच्या डान्सवर बंदी; कारण वाचून व्हाल हैराण....

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नोरा फतेही आणि तिचा डान्स यावर वेगळ काही बोलायला नको.

तुम्हाला वाचून आश्चर्य होइल की तिच्या डान्स शोला परवानगी मिळालेली नाही.

बांगलादेशच्या ढाका शहरात नोराचा लाईव्ह डान्स शो होणार होता.

मात्र बांगलादेश सरकारने तिच्या याशोची परवानगी नाकारली आहे.

डॉलर्स वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने यासंदर्भात नोटिस जारी केले आहे.

विदेशी चलनाचा तुटवडा भासू नये म्हणुन हा निर्णय घेतल्याच त्यात म्हटलंय.

‘वूमन लीडरशीप कॉर्पोरेशन’ द्वारा आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यासाठी नोराला आमंत्रण दिलं गेलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.