'या' देशांनीही उभारलं नवं संसद भवन, मोदींच्या हस्ते झालंय उद्धाटन

Amit Ujagare (अमित उजागरे)

नव्या संसदेतून काम

भारतानं नुकतेच जुन्या संसद भवनाला निरोप देत नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात केली आहे.

इतर देश कोण?

त्याचबरोबर इतरही काही देशांनी संसदेची नवी इमारत उभारली आहे.

अफगाणिस्तान -

PM मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन २०१५ मध्ये पार पडलं. भारतानं अफगाणी जनतेला दिलेलं हे बक्षीस मानलं गेलं.

भारताचं फंडिंग

अफगाणिस्तानच्या या संसदेसाठी भारतानं पैसा पुरवला होता. तब्बल ९० मिलियन डॉलरची रक्कम भारतानं पुरवली होती.

स्कॉटलंड -

एडिंबर्ग इथं स्कॉटिश संसद भवन उभारण्यात आलं. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वीतीय यांच्या हस्ते सन २००४ मध्ये याचं उद्घाटन झालं.

स्कॉटिश आर्किटेक्चर

स्कॉटिश आर्किटेक्चर प्रमाणं ही संसदेची इमारत उभारण्यात आली. ज्यामध्ये काचांच्या भीती उभारण्यात आल्या.

वेल्स -

वेल्सच्या संसदेला वेल्स नॅशन असेम्ब्ली म्हणून ओळखलं जातं. २००६ मध्ये हे भवन पूर्ण तयार झालं.

पर्यावरणपूरक इमारत -

वेल्स नॅशनल असेंम्ब्लीची जगात पर्यावरण पूरक इमारत म्हणून ओळख आहे. या इमारती शंभर वर्षे टिकू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.