आता एक स्त्री देणार पुतिनला टक्कर?

Chinmay Jagtap

ॲलेक्सी नवल्नी यांच्या मृत्युची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली.

या नंतर रविवारी त्यांच्या पत्नी Yulia Navalnaya ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यात तिने ‘आय लव्ह यू’ असे लिहिले आहे.

याच बरोबर पतीसोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.

पतीच्या आकस्मिक निधनाने दु:खी झालेल्या युलियाने अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असं म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय समुदायाने पुतीन यांच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन ॲलेक्सी नवल्नी यांनी केले होते .

आता नवल्नी यांच्या निधनानंतर युलिया राजकारणात उतरून पुतिन यांना आव्हान देईल, असे म्हटले जात आहे. मात्र युलियाला राजकारणात रस नसल्याचे त्या म्हणत आहेत.

तर दुसरीकडे रशियन राजकारणातील नामशेष होत चाललेल्या विरोधाला नवसंजीवनी देण्याची क्षमता युलियाकडे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.