PhonePe वर डेबिट कार्डशिवायही सुरू करता येणार UPI खातं

सकाळ डिजिटल टीम

इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe खूप लोकप्रिय असून, ग्राहकांच्या सोयीसाठी आता कंपनीने एक नवीन भन्नाट फीचर जारी केले आहे.

या फीचरचं वैशिष्ट म्हणजे यामध्ये डेबिट कार्डशिवाय युपीआय खातं सुरू करता येणार आहे.

नव्या फीचरमध्ये युजरला आधार कार्ड ओटीपी प्रमाणीकरणाच्या मदतीने UPI खातं सक्रिय करता येणार आहे.

अशा प्रकारचं फीचर जारी करणारे PhonePe पहिले UPI अॅप असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

यूजर PhonePe अॅप ऑनबोर्डिंग प्रोसेसमध्ये आधार कार्डचा पर्याय निवडू शकणार आहेत. यासाठी यूजरला आधार कार्डचे शेवटचे 6 अंक टाकावे लागतील.

या सुविधेमुळे आता युजर्स डेबिट कार्डच्या डिटेल्सशिवाय हे पेमेंट अॅप वापरू शकणार आहेत.

रजिस्ट्रेशन करतना यूजरला आधारचे शेवटचे 6 अंक टाकावे लागतील.

आधारचे शेटवटचे सहा नंबर टाकल्यानंतर यूजरला रजिस्टर मोबाइल क्रमांकावर UIDAI कडून OTP मिळेल.

तसेच बँकेकडूनही OTP मिळेल. या दोन्हींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर यूजर पेमेंट अॅप वापरू शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.