तुम्हाला माहिती आहे का?, जायफळापासूनही मिळते चमकदार त्वचा...

सकाळ डिजिटल टीम

जायफळचे अनके फायदे आहेत. हे केवळ खाण्यासाठी नाही तर त्वचेसाठीही वापरता येते.

जायफळाचे त्वचेला होणारे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी जायफळाचा वापर होतो. यामुळे पडलेले डागही दूर होतात.

चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर दिसून येत असेल तर तो जायफळाच्या मदतीने काढून टाकता येतो.

यामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होतात. याचा वापर करत असताना त्वचेला इतर कोणताही संसर्ग होत नाही.

तुम्ही जायफळ पाण्याने घासून चेहऱ्यावर लावू शकता. किंवा जायफळाची पावडर करुन ती पेस्टही तयार करु शकता.

ही पेस्ट आठवड्यातून एकदाच चेहऱ्यावर लावा. ते गरम असल्याने मृत त्वचेवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

त्वचा संवेदनशील असेल तर जायफळ वापरु नका. कारणे त्यामुळे खाज उठणे आणि जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.