Sandip Kapde
पुणे भारतातील महत्वाचे शहर आहे.
पुणे अनेक वेळा "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून ओळखले गेले आहे.
पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहेत.
पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे.
पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.
पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते
असे अनेकवेळा म्हणतात पुणे जगण्याचं अन् अनुभवण्याचं शहर आहे.
आता पुण्याला आधुनिक स्वरुप आलं आहे पण पुण्याते जुने फोटो बघितले तर तुम्ही पुण्याच्या प्रेमात पडाल
किमान १०० ते १५० वर्षापूर्वी पुणे देखील सुंदर होत.
सिमेंटचं जगंल नव्हत, सगळीकडे हिरवळ आणि ताजी हवा, असा अंदाज या फोटोमधून येतो.
पुण्याचं रेल्वे स्टेशन कसं असेल? खडकवासला धरण कसं दिसत असेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर त्या प्रश्नांचे उत्तर या फोटोमध्ये आहे.
पर्वती, शनिवार वाडा देखील या फोटोमध्ये पाहू शकता
पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्यामुळे देशात पुण्याला महत्व आहे
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक आणि अहमदनगर जिल्हे, दक्षिणेस सातारा आणि सोलापूर जिल्हे आणि पूर्वेस रायगड जिल्ह्याची सीमा आहे.
पुणे जिल्हा हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, पुणे शहर अशा चौदा तालुक्यांमध्ये जिल्हा विभागलेला आहे.
ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
पुणे जिल्हा दख्खनच्या पठारावर स्थित आहे आणि १५,६४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतो.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा तसेच शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.
मुळा आणि मुठा नद्या जिल्ह्यातून वाहतात आणि शेतीसाठी सिंचनाचे प्राथमिक स्त्रोत आहेत.
पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण, पानशेत धरण आणि वरसगाव धरण यासह अनेक धरणे आहेत, जे सिंचन आणि जलविद्युतसाठी पाणी पुरवतात.
पुण्याला मराठा साम्राज्यापासून समृद्ध इतिहास आहे. या प्रांतावर मराठे, पेशवे आणि इंग्रजांचे राज्य होते.
पुणे हा महाराष्ट्राचा एक सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे,
पुण्याची अर्थव्यवस्था शिक्षण आणि आयटी उद्योगांनी चालविली आहे.