लांब आणि घनदाट केसांसाठी ऑलिव्ह ऑईलपासून बनवा ‘हे’ हेअरमास्क

Monika Lonkar –Kumbhar

केसांसाठी फायदेशीर

केसांना योग्य पोषण मिळावे आणि केस मुलायम रहावेत यासाठी आपण केसांना तेल लावतो. खोबरेल तेल, बदाम तेल यासोबतच केसांसाठी ऑलिव्ह ऑईल देखील फायदेशीर आहे. 

Olive oil hair masks

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग गुणधर्म असतात. त्यामुळे, हे तेल घनदाट आणि लांब केस बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. 

Olive oil hair masks

हेअर मास्क

लांब आणि घनदाट केसांसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलपासून हेअर मास्क बनवू शकता. 

Olive oil hair masks

ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याचा हेअरमास्क

भरपूर प्रोटिनने युक्त असलेला हा हेअरमास्क बनवण्यासाठी २ अंड्यांमधील पिवळा बल्क घ्या. आता या पिवळ्या बल्कमध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. 

Olive oil hair masks

आता या मिश्रणात १ चमचा दही आणि लिंबाचा रस घाला. २० ते २५ मिनिटे केसांवर हा हेअर मास्क लावा. त्यानंतर, केस धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी केसांना हा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा लावा.

Olive oil hair masks

नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क

केसांच्या वाढीसाठी तुम्ही केसांवर या दोन्ही तेलांचा वापर करू शकता. एका बाऊलमध्ये नारळाचे तेल घ्या. त्यानंतर, त्या तेलाच्या निम्मे ऑलिव्ह ऑईल त्यात मिसळा. आता हे दोन्ही तेल एकत्रपणे मिक्स करून गरम करा. त्यात हवे असल्यास तुम्ही कापूर देखील घालू शकता.

Olive oil hair masks

तेल कोमट झाल्यावर या तेलाने केसांवर छान मसाज करा. त्यानंतर, १ तासाने केस धुवून टाका. या हेअर मास्कचा वापर केल्याने केसगळती कमी होते आणि केसांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होते. 

Olive oil hair masks

लक्षद्वीपमध्ये फिरायला जाताय? मग, या बेटांना भेट द्यायला विसरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshadweep | esakal