Aishwarya Rai : या एका उत्तरानं ऐश्वर्या बनली होती मिस वर्ल्ड

साक्षी राऊत

अन् बनली मुकुटाची मालकीण

ऐश्वर्याने १९९४ मधे आयोजित मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंटमधे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर फार समजुतदारीने दिलं होतं. त्यामुळेच ती मिस वर्ल्ड बनली.

Aishwarya Rai

काय होता प्रश्न

ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं की मिस वर्ल्डमधे कुठले गुण असावेत. त्याचं उत्तर तिने अशा प्रकारे दिलं की तिने सगळ्यांची मनं जिंकली.

Aishwarya Rai

हे होतं उत्तर

ऐश्वर्याने म्हटले की आतापर्यंत तिने जितक्याही मिस वर्ल्ड बघितल्या त्यांच्यामधे दयाभाव होता. हा दयाभाव फक्त मोठ्यांसाठीच नसून ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यासाठीसुद्धा होता.

Aishwarya Rai

ऐश्वर्या म्हणाली मिस वर्ल्डमधे दयाभाव असणे फार गरजेचे आहे.

कुठल्याही ब्यूटी पेजेंटमधे बाहेरूनच नाही तर आतूनही कारूण्य, समजदारी हे स्वभावगुण बघितले जातात. ऐश्वर्या या परीक्षेत पास झाली.

८७ देशांच्या सुंदऱ्या होत्या

१९९४ मधे आयोजित मिस वर्ल्ड पजेंटमधे एकून ८७ देशांतील तरुणींनी सहभाग घेतला होता. ऐश्वर्याने तिच्या उत्तराने मुकुट आपल्या नावी केलं.

Aishwarya Rai

आर्किटेक्चर बनायचं होतं

तेव्हा ऐश्वर्या फक्त २१ वर्षांची होती. तिला आर्किटेक्ट बनायचं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai