वनप्लसचा नवीन टॅब्लेट 'पॅड गो' लाँच; पाहा फीचर्स अन् किंमत

Sudesh

वनप्लस

टेक कंपनी वनप्लसने आपला दुसरा टॅब्लेट भारतात लाँच केला आहे. OnePlus Pad Go असं या टॅब्लेटचं नाव आहे.

OnePlus Pad Go | eSakal

डिस्प्ले

या टॅब्लेटमध्ये 11.35 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 2408x1720 अल्ट्रा हाय रिझॉल्यूशन आणि 90 Hz रिफ्रेश असे फीचर्स यात आहे. याचा अ‍ॅस्पेक्ट रेशिओ 7:5 आहे.

OnePlus Pad Go | eSakal

सॉफ्टवेअर

या टॅब्लेटमध्ये मीडियाटेक हीलिओ G99 ऑक्टा कोअर प्रोसेसर दिला आहे. सोबत यामध्ये अँड्रॉईड 13 आधारित ऑक्सिजन 13.1 ओएस देण्यात आली आहे.

OnePlus Pad Go | eSakal

कॅमेरा

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर प्रायमरी कॅमेरा देखील 8MP क्षमतेचा आहे. यासोबत फ्लॅशही दिला आहे.

OnePlus Pad Go | eSakal

बॅटरी

वनप्लस पॅड गोमध्ये 8,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचा स्टँडबाय बॅकअप 514 तास आहे. चार्जिंगसाठी टाईप सी पोर्ट दिला आहे.

OnePlus Pad Go | eSakal

कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हिटीसाठी या टॅब्लेटमध्ये ब्लूटूथ 5.3, वायफाय 6, जीपीएस, यूएसबी-सी पोर्ट, LTE आणि 5G असे पर्याय देण्यात आले आहेत.

OnePlus Pad Go | eSakal

किंमत

'वनप्लस पॅड गो'च्या 8GB+128GB वायफाय व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8GB+128GB LTE व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे. 8GB+256GB LTE व्हेरियंटची किंमत 23,999 रुपये आहे.

OnePlus Pad Go | eSakal

बुकिंग

12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपासून याचं बुकिंग सुरू करता येणार आहे. वनप्लसची वेबसाईट, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या पर्यायांच्या माध्यमातून हा टॅब्लेट प्री-ऑर्डर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OnePlus Pad Go | eSakal