Oppo New Launch : Oppo F27 सीरीज भारतात येणार!

सकाळ डिजिटल टीम

Oppo कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फिचर असलेले स्मार्टफोन लाँच करत असते.

Oppo F27 सीरीज लवकरच भारतात येणार असल्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार, ही सीरीज 13 जून रोजी लाँच होऊ शकते.

या सीरीजमध्ये Oppo F27, Oppo F27 Pro आणि Oppo F27 Pro+ असे तीन फोन असतील.

यातील Oppo F27 Pro+ भारतातला पहिला IP69 रेटिंग असलेला स्मार्टफोन असू शकतो. (धुळी आणि पाण्यापासून संरक्षण)

रिपोर्ट्सनुसार,लीक झालेल्या पोस्टमध्ये दिसणारा फोन Oppo A3 Pro सारखा दिसतोय. Oppo A3 Pro हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच झाला आहे.

यामुळे Oppo F27 Pro ची Oppo A3 Pro ची रीब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे.

जर ही रिपोर्ट बरोबर असेल तर Oppo F27 Pro मध्ये Dimensity 7050 चिप आणि 12GB रॅम असू शकते.

यात 64MP प्राइमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरी असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.