ओप्पोचा नवा फ्लिप फोन लाँच; सॅमसंगला देणार टक्कर?

Sudesh

Oppo Find N3 Flip

सॅमसंग आणि मोटोला टक्कर देण्यासाठी ओप्पोने आपला नवा फ्लिप फोन लाँच केला आहे. ओप्पोच्या आधीच्या फ्लिप फोनचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

Oppo Find N3 Flip | eSakal

डिस्प्ले

या फोनमध्ये 3.26 इंच कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन उघडल्यानंतर त्याची मुख्य स्क्रीन 6.8 इंच एवढी आहे. हा AMOLED LTPO डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे.

Oppo Find N3 Flip | eSakal

हिंज

फोल्डिंगसाठी ओप्पोने नवीन 'फ्लेक्सियन हिंज' वापरलं आहे. यामुळे स्क्रीन उघडल्यानंतर अगदी जाणवणार नाही असा क्रीज तयार होतो.

Oppo Find N3 Flip | eSakal

सॉफ्टवेअर

N3 फ्लिप फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9200 चिपसेट देण्यात आली आहे. तसंच, हा स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित ColorOS 13.2 वर काम करतो.

Oppo Find N3 Flip | eSakal

स्टोरेज आणि बॅटरी

यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 रॅम दिली आहे. या फोनमध्ये 4,300 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo Find N3 Flip | eSakal

कॅमेरा

Find N3 Flip मध्ये ट्रिपल50 कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP क्षमतेचा आहे. यासोबतच एक 48 MP अल्ट्रावाईड आणि 32 MP टेलिफोटो लेन्स असणारा कॅमेराही यामध्ये दिला आहे.

Oppo Find N3 Flip | eSakal

कॅमेरा

फोन उघडल्यानंतर आतल्या बाजूला 32MP पंच होल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बाहेरच्या बाजूला असलेल्या स्क्रीनचा वापर करुनही फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करता येऊ शकतात.

Oppo Find N3 Flip | eSakal

किंमत

Oppo Find N3 Flip या फोनची किंमत 94,999 रुपये एवढी आहे. यामध्ये क्रीम गोल्ड आणि स्लीक ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

Oppo Find N3 Flip | eSakal

बुकिंग

या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली असून, 22 ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट, ओप्पो या वेबसाईट आणि सर्व प्रमुख रिटेलर्सकडे हा फोन उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oppo Find N3 Flip | eSakal