ओटीटीवर सगळ्यात जास्त कोण लोकप्रिय माहितीये?

युगंधर ताजणे

मनोज वाजपेयीच्या सिर्फ एक बंदा काफी है नं चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली होती. त्यानं मनोजला एक वेगळी लोकप्रियता मिळवून दिल्याचे दिसून आले.

Manoj Bajpayee

मनोजनं त्या मालिकेमध्ये एका वकीलाची भूमिका साकारली होती. केवळ प्रेक्षक नाहीतर समीक्षकांनी देखील मनोजचं कौतुक केलं होतं. त्याची प्रशंसा केली होती.

Manoj Bajpayee

जाने जानच्या जयदीप अहलावतविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यानं आजवर केलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. त्याच्या जाने जानचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

Jaydeep Ahalawat

शाहिद कपूरनं फर्जीमधून बाजी मारल्याचे दिसून आले आहे. त्या मालिकेनं तो आणखी लाईमलाईटमध्ये आला. वेगळ्या धाटणीची भूमिका त्यानं साकारली होती.

Shahid Kapoor

शाहिदनं आजवर कमीने, हैदर, कबीर सिंग सारख्या चित्रपटांतून आपण किती ताकदीचे अभिनेते आहोत हे दाखवून दिले आहे.

Shahid Kapoor

विजय शर्मानं दहाड नावाच्या मालिकेमध्ये जे काम केले त्यामुळे तो चर्चेत आला होता. त्यात त्यानं सोनाक्षी सिन्हा सोबत महत्वाची भूमिका साकारली होती.

Vijay Varma

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा अभिनेता म्हणून नेहमीच नवाझुद्दीनकडे पाहिले गेले आहे.

Nawazuddin Siddhiqui

हड्डीमध्ये नवाझुद्दीननं जो अभिनय केला होता त्याचे वारेमाप कौतुक झाले होते. त्याच्या करिअरमधला आजवरचा सर्वाधिक उत्कृष्ट अभिनय म्हणून त्याकडे पाहिले गेले.

Nawazuddin Siddhiqui

प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी काला पानीमध्ये केलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. केवळ प्रतिभावान दिग्दर्शकच नव्हे तर प्रभावी अभिनेता देखील आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ashutosh Gowarikar