शोएबची पत्नी सनाचा दिलखेचक अंदाज पाहिलाय?

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिक-सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अशातच शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना उधाण आलं.

Sana Javed | Esakal

शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले.

Sana Javed | Esakal

कोण आहे सना जावेद?

सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पाकिस्तानी कुटुंबात झाला होता.

Sana Javed | Esakal
Sana Javed | Esakal

जेद्दाहमधील पाकिस्तान इंटरनॅशनल स्कूलमधून शाळा आणि महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर, ती तिच्या कुटुंबासह कराचीला गेली. आणि नंतर कराची विद्यापीठातून तिने पदवी प्राप्त केली.

Sana Javed | Esakal

तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. पुढे २०१२ मध्ये अभिनयात पदार्पण केल्यानंतर तिने 'प्यारे अफझल' या टीव्ही मालिकेतील भूमिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळवली.

Sana Javed | Esakal

सनाने अनेक पाकिस्तानी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय मॉडेलिंग करिअरमध्ये सनाने तिची छाप पाडली असून विविध पुरस्कार पटकावले आहेत.

Sana Javed | Esakal

१९ जानेवारीला सनाने शोएबसोबत दुसरं लग्न केलं.

Sana Javed | Esakal

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. शनिवारी सकाळी त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.

Sana Javed | Esakal

शोएब मलिकने याआधी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. मात्र काही दिवसाआधी दोघेही वेगळे झाले अशा बातम्या येत होत्या, आता या दरम्यान शोएब मलिकच्या लग्नाची बातमी समोर आल्याने चर्चांना उधाण आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sana Javed | Esakal