जेव्हा आई श्वेता तिवारीने पलकला रंगेहाथ पकडले

Sandip Kapde

श्वेता तिवारी

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर तिचा दबदबा आहे.

Palak Tiwari

सलमान खान

पलकने अलीकडेच सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Palak Tiwari

पलक

अवघ्या 22 वर्षांच्या पलकचे खूप चाहते आहेत. पलकचे तिची आई श्वेतासोबतही खास बॉन्ड आहे.

Palak Tiwari

श्वेता तिवारी

अभिनेत्रीने एका ताज्या मुलाखतीत खुलासा केला की तिची आई श्वेता तिवारी तिला डेटिंग करण्यापासून रोखण्यासाठी अनेक युक्त्या वापरते.

Palak Tiwari

बॉलीवूड

बॉलीवूड बबलला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीने तिच्या बालपणातील अनेक किस्से सांगितले आणि तिची आई श्वेता तिवारीने तिला रंगेहाथ पकडले तेव्हाचे काही क्षणही आठवले.

Palak Tiwari

पलक

पलकने खुलासा केला की, जेव्हा ती किशोरवयात होती आणि मुलासोबत डेटवर जाण्यासाठी तिच्या आईशी खोटे बोलत असे, तेव्हा तिची आई श्वेता तिवारी हे लगेच ओळखत असे.

Palak Tiwari

पलकने खुलासा केला की, "माझी सर्वात मोठी अडचण ही होती की मी खूप खोटं बोलायची आणि लोक मला पकडायचे. माझी आई म्हणायची की तू खोटं का बोलतेस?"

Palak Tiwari

बॉयफ्रेंड

माझा एक बॉयफ्रेंड होता जेव्हा मी 15 किंवा 16 वर्षांची होते जसे की तुमचा शाळेत बॉयफ्रेंड असतो आणि मग आम्ही मॉलमध्ये जायचो.

Palak Tiwari

मी त्याच्याबरोबर मॉलमध्ये जात होते आणि मी माझ्या आईला सांगितले की मी लपाछपी खेळायला खाली जात आहे. आई म्हणाली ठीक आहे पण ती शहरात नव्हती आणि मग तिला समजले की मी खेळत नाही तर मॉल मध्ये आहे. तिला खूप राग आला होता.

Palak Tiwari

व्यावसायिक कारकिर्दीव्यतिरिक्त पलक तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील अनेकदा चर्चेत असते. पलकबद्दल बऱ्याच दिवसांपासून अशी अफवा होती की ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे.

Palak Tiwari

या अफवांना उधाण आले जेव्हा दोघेही इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. नुकतेच दोघेही सुट्टीवर एकत्र दिसले होते. त्याचवेळी पलकने एकदा अशा सर्व अटकळांवर प्रतिक्रिया दिली होती. पलक म्हणाली होती की ती आणि इब्राहिम फक्त खास प्रसंगीच एकमेकांना भेटतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari