सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत पंकज त्रिपाठी सामील झाले आहेत.
एके काळी पंकज त्रिपाठींना कोणी ओळखत नव्हतं. आता त्यांच्या नावाने चित्रपटांना ओळख मिळतेय.
मायानगरीत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष करावा लागला होता.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कधी काळी त्यांना पत्नीच्या पैशांतून घर चालवावं लागत होतं.
पंकज त्रिपाठी आता कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत.
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसांड गावात ५ सप्टेंबर १९७६ रोजी जन्मलेल्या पंकज त्रिपाठी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
त्यांनी गावातल्या नाटकांमध्ये मुलीची भूमिका करायला सुरुवात केली होती, जी लोकांना खूप आवडली होती.
पंकज नाटकात इतकं चांगलं काम करायचा की लोक त्यांना बॉलिवूड अभिनेत्रींसाठी आव्हान समजायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.