Sudesh
सध्या उच्चशिक्षण घेणं एवढं महाग झालं आहे, की बहुतांश लोकांना त्यासाठी कर्ज घ्यावंच लागतं.
अशा वेळी पालकांनी पर्सनल लोन घ्यावं, की विद्यार्थ्याच्या नावावर एज्युकेशन लोन घ्यावं, याबाबत संभ्रम निर्माण होतो.
यामधील कोणतं कर्ज तुमच्यासाठी योग्य आहे, हे पाहण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे.
कोणतीही बँक किंवा पतसंस्था सुमारे ४० लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन देते, तर शैक्षणिक कर्ज ५० हजार रुपयांपासून १.५ कोटींपर्यंत मिळू शकते.
शैक्षणिक कर्जाची सुरुवात सुमारे ८.५ टक्के एवढ्या व्याजदरापासून होते. काही बँका विद्यार्थ्यांना व्याजदरात ०.५ टक्के सूटही देतात. तर पर्सनल लोनची सुरूवातच १०.५ टक्के एवढ्या व्याजदरापासून होते.
पर्सनल लोन घेतल्यावर जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंतचा परतफेड अवधी मिळतो. तर, शैक्षणिक कर्जासाठी जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंतचा परतफेड कालावधी मिळतो.
भारतात ४ लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी कोणीही जामीन राहण्याची गरज नसते. त्यापेक्षा अधिक रकमेसाठी तुम्हाला जामीनदाराची गरज भासते. तसंच, बँकेकडे काही गहाण ठेवावं लागतं.
शैक्षणिक कर्ज घेतलं असल्यास शिक्षण पूर्ण होऊन एक वर्षांनी EMI सुरू होतो. तर, पर्सनल लोन घेतलं असल्यास पुढच्याच महिन्यापासून EMI सुरू होतो.
प्राप्तीकर अधिनियम 80E अंतर्गत परतफेडीच्या पहिल्या ८ वर्षांमध्ये शैक्षणिक कर्जातील व्याजावर कोणताही कर लागू होत नाही. मात्र, अशी सुविधा वैयक्तिक कर्जामध्ये उपलब्ध नाही.
एकूणच एज्युकेशनल लोन हे फायद्याचं ठरतं. मात्र, काही कारणास्तव ते घेणं शक्य नसल्यास झटपट मिळणारं पर्सनल लोनही तुम्ही घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.