धर्मशाळामध्ये फिरायला जाताय? ही ठिकाणं नक्की बघा

Manoj Bhalerao

नैसर्गिक सौंदर्य

हिमाचलप्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा अत्य़ंत सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हे ठिकाण देवदार आणि पाईन वृक्षांनी भरलेला आहे.

पर्यटन

आम्ही तुम्हाला धर्मशाळामधील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिकडे तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

त्रिउंड हिल

ट्रेकर्स आणि एड्वेंचर आवडणाऱ्या लोकांची आवडती जागा त्रिउंड हिल्स धर्मशाळामधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

नाईट कॅम्पिंग

हिलवर पोहोचल्यानंतर तुम्हाला बर्फाने झाकलेले डोंगर आणि प्राचीन काळासारखी मंत्रमुग्ध करणारी सुंदरता दिसेल. या ठिकाणी नाईट कॅम्पिंगची मजा घेऊ शकता.

धर्मशाळा स्टेडियम

क्रिकेट चाहत्यांमध्ये धर्मशाळा क्रिकेट स्टेडिअम अत्यंत लोकप्रिय आहे. धौलाधार पर्वतरांगेत असलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १४५७ मीटर उंचावर आहे.

वैशिष्ट्य

धर्मशाळामधील क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात उंचावरील क्रिकेट स्टेडियम म्हणून प्रसिद्ध आहे. हे पर्यटकांसाठी खुलं देखील असतं.

युद्ध स्मारक

धर्मशाळामधील लोकप्रिय ठिकाणांमधील एक वॉर मेमोरिअल पाहण्यासारखी जागा आहे. या स्मारकात काळ्या संगमरवराच्या ३ मोठ्या भिंती आहेत.

मॅक्लॉडगंज

हे ठिकाण हिमाचलप्रदेशच्या कांगडा जिल्हाच्या हद्दीत येतं आणि धर्मशाळापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.

भागसूनाग मंदिर

महादेवाला समर्पित करण्यात आलेल, प्राचीन भागसूनाग किंवा भागसूनाथ मंदिर धर्मशाळामधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर मॅक्लॉडगंजपासून ३ किलोमीटरपासून लांब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.