Belgaum : शेतात विमान कोसळून पायलटसह अनेक जण जखमी, बेळगावात दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव तालुक्‍यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह काही जण जखमी झाले.

बेळगावच्या सांबरा विमानतळावर VT-RBF of Redbird Aviation Flight Training Organisation कडून प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.

ही बाब कळताच मारीहाळ स्टेशन पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

विमानाचं आपत्कालीन लँडिंग का करण्यात आलं याचा शोध घेतला जात आहे.

कोसळलेलं विमान पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crashed in Honnihal Village